महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मुंबई हल्ल्यातील दोषी हाफिज सईदला ११ वर्षांचा तुरुंगवास, पाकिस्तानी न्यायालयाचा निकाल - हाफिज सईद

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याला दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बुधवारी याबाबत निकाल दिला.

Pak court convicts Saeed
दहशतवाद्यांना वित्तपुरठा केल्याप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने हाफिज सईदला ठरवले दोषी!

By

Published : Feb 12, 2020, 4:44 PM IST

Updated : Feb 12, 2020, 6:52 PM IST

इस्लामाबाद - २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याला दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बुधवारी याबाबत निकाल दिला. यासोबतच त्याला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही न्यायालयाने यावेळी ठोठावली.

पाकिस्तानने याआधी हाफिज सईदला आपली बँक खाती वापरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका झाली होती.

हाफिज हा २६/११ला झालेल्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्याला संयुक्त राष्ट्रांनी आधीच दहशतवादी घोषित केलेले आहे. तसेच, त्याच्या दोन्ही संघटना 'जमात-उद-दवा' आणि 'फलाह-ए-इन्सानियत' यांच्यावरही दहशतवादी संघटना घोषित करून बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जगातील दहशतवादी संघाटनांच्या यादीत अल-कायदा, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, लश्कर-ए-जंघवी, लश्वर-ए-तोयबा या संघटनांचाही समावेश आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details