महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू - doctors died of corona infection in Indonesia

इंडोनेशियात कोरोना संसर्गामुळे 180 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियन मेडिकल असोसिएशनने मृत 180 पैकी 92 डॉक्टर सामान्य चिकित्सक, 86 विशेष तज्ज्ञ आणि दोन रहिवासी डॉक्टर असल्याचे सांगितले आहे. इंडोनेशियात आतापर्यंत एकूण 5 लाख 48 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकरणे नोंदली गेली असून 17 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, 4 लाख 55 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू
इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू

By

Published : Dec 1, 2020, 5:33 PM IST

जकार्ता -इंडोनेशियात कोरोना संसर्गामुळे साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यापासून, एकूण 180 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सिन्हुआच्या वृत्तानुसार, इंडोनेशियन मेडिकल असोसिएशनने मृत 180 पैकी 92 डॉक्टर सामान्य चिकित्सक, 86 विशेष तज्ज्ञ आणि दोन रहिवासी डॉक्टर असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा -वुहानमधील तपास अधिकाऱ्यांना गोठवलेल्या अन्नावर आढळला कोविड-19चा विषाणू

मृत डॉक्टरांपैकी 38 पूर्व जावा, 27 जकार्ता, 24 उत्तर सुमात्रा, 15 मध्य जावा आणि 12 पश्चिम जावा येथील होते.

इंडोनेशियात आतापर्यंत एकूण 5 लाख 48 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची प्रकरणे नोंदली गेली असून 17 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, 4 लाख 55 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा -अफगाणिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 ठार, 24 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details