बीजिंग -चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला (कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना - सीपीसी) एक जुलैला 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. 100 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जुलै रोजी शताब्दी साजरी करण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी देशवासियांना संबोधित केले. परकीय देशांनी चीनवर दडपशाही किंवा वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना चीनच्या अभेद्य अशा 1.4 अब्ज नागरिकांचा सामना करावा लागेल, असे जिनपिंग म्हणाले.
गुरुवारी सकाळी लष्कराची विमानांनी उड्डाने घेतली. 56 चिनी जाती समुदायांच्या सन्मानार्थ 56 तोफांची सलामी देण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी चीनची राजधानी बीजिंगमधील टियानॅनमेन स्क्वेअरवर लोकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी बहुतेकांनी मास्क घातलेले नव्हते.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921 साली झाली होती. प्रदीर्घ गृहयुद्धानंतर पक्ष सत्तेत आला होता. या काळात चीनमध्ये अनेक बदल झाले. कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात 30 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून बर्ड्स नेक्स्ट स्टेडियमवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बीजिंगमधील बर्ड्स नेक्स्ट स्टेडियमवर ‘द ग्रेट जर्नी’ या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचा आणि देशाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. संपूर्ण शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. शांघायमधील इमारती झगमगत होत्या. लाईट शो आयोजित करण्यात आला होता. बर्याच शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फुलांनी सजावट केली गेली होती.
हेही वाचा -#CPC100Years : चिनी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्षं पूर्ण, शताब्दी सोहळ्याचे पाहा फोटो