महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

#COVID२०१९: चीनमध्ये कोरोनाचा कहर.. दोन हजार मृत्यू; तर ७४ हजार नागरिकांना संसर्ग

विषाणूमुळे लागण झालेल्यांची संख्या ७४ हजारांच्या पुढे गेली आहे. २० फेब्रुवारीपासून रशियाने चीनी नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे.

corona file pic
कोरोना विषाणू संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 19, 2020, 7:44 AM IST

बीजिंग - कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत २ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवारी) १३६ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. यातील सर्वात जास्त मृत्यू हुबेई प्रांतात झाले आहेत. आणखी १ हजार ७०० नागरिकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ७४ हजारांच्या पुढे गेली आहे. २० फेब्रुवारीपासून रशियाने चीनच्या नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. 'चीनमध्ये प्रसार झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणाच्या बाहेर गेला नाही, मात्र, विषाणूच्या प्रसारामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे', असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिओ गुटेरस यांनी सांगितले. दक्षिण कोरियामध्ये दहा कोरोनाचे रुग्ण आढळून आहे आहेत.

डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही कठीण झाले आहे. सर्व शहरे सुनसान झाली आहेत. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणीबाणी हाताळताना अडचणी येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details