पाकिस्तान भारतावर एक नाही ५० अणुबॉम्ब टाकणार - परवेज मुशर्रफ
भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर शेजारील देश २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नष्ट करेल. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकायला हवेत म्हणजे ते आमच्यावर २० बॉम्ब टाकू शकणार नाहीत, असे मुशर्रफ बरळले. या वक्तव्यावर त्यांनी आता घुमजाव केला आहे.
आबुधाबी - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संतापाचे वातावरण असताना पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भडकाऊ विधान केले आहे. भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर शेजारील देश २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नष्ट करेल. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकायला हवेत म्हणजे ते आमच्यावर २० बॉम्ब टाकू शकणार नाहीत, असे मुशर्रफ बरळले आहेत.
युएईमध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुशर्रफ म्हणाले की, भारत-पाकिस्तानमधील संबंध पुन्हा बिघडले आहेत. ते आमच्यावर हल्ला करणार नाहीत. आम्ही त्यांच्यावर एक अणुबॉम्ब टाकला तर शेजारी देश २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नष्ट करतील. त्यामुळे यावर एकच उपाय आहे, अगोदर त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकायला हवेत, ज्यामुळे ते पाकिस्तानवर २० टाकू शकणारच नाहीत. ५० अणुबॉम्ब त्यांच्यावर टाकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
या वक्तव्यावर त्यांनी आता घुमजाव केला आहे. पाकिस्तान भारतावर हल्ला करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिले आहे.