महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

उत्तर कोरियाची पुन्हा आगळीक; पूर्व समुद्रात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी - उत्तर कोरिया

आमची सुरक्षा दले सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. उत्तर कोरियाकडून आणखी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे का ? यावरही आम्ही नजर ठेवून आहोत. तसेच आम्ही पुर्णपणे सतर्क आहोत, असे दक्षिण कोरियाचे जॉईन्ट चिफ ऑफ स्टाफ यांनी सांगितले.

उत्तर कोरिया

By

Published : Jul 25, 2019, 10:23 AM IST

सेऊल - उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तर कोरियाने पूर्व समुद्रामध्ये पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. ही क्षेणपणास्त्रे कोणत्या श्रेणीतील आहेत, हे मात्र समजू शकले नाही.

गुरुवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) ५.३० आणि ५.५७ वाजता दोन क्षेपणास्त्रे पूर्व समुद्रात (सी ऑफ जपान) डागण्यात आली. उत्तर कोरियातील वोनसॅन भागातून डागण्यात आलेली ही क्षेपणास्त्रे ४३० कि.मी पर्यंत गेल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

आमची सुरक्षा दले सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. उत्तर कोरियाकडून आणखी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे का? यावरही आम्ही नजर ठेऊन आहोत. तसेच आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत, असे दक्षिण कोरियाचे जॉईन्ट चिफ ऑफ स्टाफ यांनी सांगितले.

जून महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी दोन्ही देशांच्या 'डिमीलिटराईज्ड' (लष्कर तैनात करण्यास परवानगी नसलेला सीमा भाग) भागामध्ये भेट दिली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी मे महिन्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details