सेऊल - उत्तर कोरियाने २०१९ साली अण्विक शस्त्रांवर 6.20 कोटी डॉलर खर्च केल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय आण्विक शस्त्र विरोधी संघटनेने वर्तवला आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर अण्वस्त्रांविरोधात जगजागृतीचे अभियान राबवित आहे. त्यामुळे संघटनेला नोबेल पारितोषिकही मिळाले आहे.
मागील काही वर्षांत उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम-जोंग-उन याने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला आण्विक हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. तसेच अनके आण्विक चाचण्या केल्या आहेत. कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाचा सर्वात जास्त धोका दक्षिण कोरियाला निर्माण झाला आहे.
या संघटनेने ९ देशांचा आण्विक विकास कार्यक्रमाचा अभ्यास करून अंदाज वर्तविला आहे. उत्तर कोरियाकडे अंदाजे ३५ आण्विक क्षेपणास्त्रे आहेत. तर भविष्यात जमिनीवरून आणि समुद्रातून डागता येऊ शकते, असे क्षेपणास्त्र कोरिया तयार करत आहे, असे अहवाला म्हटले आहे. ६. २० कोटी डॉलर रक्कम २०१९ साली आण्विक कार्यक्रमावर खर्च केली तर एवढीच रक्कम मागील २ वर्षांपासून कोरिया खर्च करत आला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
दक्षिण कोरियातील थिंक टँक आणि कोरियन बँकेच्या अहवालांचा हवाला
या अभ्यासात दक्षिण कोरियांतील वैचारिक गटांनी(थिंक टँक) केलेल्या अभ्यासाचाही आधार घेण्यात आला आहे. उत्तर कोरियाने २००९ साली एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३५ टक्के खर्च लष्करावर केला असा अंदाज दक्षिण कोरियातील वैचारिक गटांनी वर्तविला होता. तर २०११ साली उत्तर कोरियाने एकूण लष्करी अर्थसंकल्पाच्या ६ टक्के रक्कम आण्विक शस्त्र तयार करण्यासाठी खर्च केली, असे दुसऱ्या एका अण्वस्त्र विरोधी गटाने केला आहे, याचा आधार अहवालात घेण्यात आला आहे. २०१८ साली उत्तर कोरियाचे राष्ट्रीय उत्पन्न अंदाजे ३५. ८९५ ट्रिलियन कोरियन चलनात होते, असे बँक ऑफ कोरियाने म्हटले आहे.