महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Imran Khan : इम्रान खान यांचे पंतप्रधानपद धोक्यात, 25 मार्चला होणार अविश्वास ठरावाबाबत फैसला - अविश्वास ठरावाबाबत फैसला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे खूर्चीवर बसणार की त्यांचा पायउतार होणार याचा फैसला 25 मार्च रोजी होणार आहे. कारण, बिलावल अली झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान सरकारमधील मित्र पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट हे सर्वजण इम्रान खान विरोधात एकवटले असून त्यांनी इम्रान खान विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत 25 मार्च रोजी चर्चा होणार असून इम्रान सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अन्यथा इम्रान खान त्यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

इम्रान खान
इम्रान खान

By

Published : Mar 23, 2022, 5:12 PM IST

इस्लामाबाद -पाकिस्तानमधील नॅशनल असेंबलीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर ( No-Confidence motion against Imran Khan ) चर्चा करण्यासाठी 25 मार्च रोजी बैठक बोलावली आहे. याबाबत त्यांनी रविवारी (दि. 20 मार्च) रोजी घोषणा केली होती. बिलावल अली झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान सरकारमधील मित्र पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट हे सर्वजण इम्रान खान विरोधात एकवटले आहेत. एवढेच नाही तर इम्रान खान यांच्या जवळच्या मंत्र्यांनीही त्यांच्याविरोधात बंड पुकारल्याचे दिसून येत आहे. यामुळे इम्रान खान व त्यांच्या सरकारला राजीनामा द्यावा लागणार, अशी शक्यता आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या मेहेरबानीमुळेच इम्रान खान यांना सत्ता मिळाली होती. परंतु, देशात नीती लागू करण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. महागाई, देशावरील वाढते कर्ज आणि कथित कुशासन यासाठी इम्रान खान सरकारवर टीकेचा भडीमार होतो आहे. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानात लष्कर आणि आयएसआय सरकार बनवण्यासाठी आणि पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते, हे अनेकदा स्पष्टपणे समोर आलेले आहे.

25 मार्चला होणार इम्रान खान यांच्याबाबत होणार फैसला- क्रिकेटमधून राजकारणात आलेल्या खान यांना पायउतार करण्यासाठी विरोधी पक्षाला 342 दसस्यीय नॅशनल असेंबलीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी 172 सदस्यांची गरज आहे. इम्रान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाला 155 जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थिर ठेवण्यासाठी व आपली खूर्ची वाचविण्यासाठी त्यांना 172 मतांची गरज आहे. इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 25 मार्च रोजी पाकिस्तानी नॅशनल असेंबलीत म्हणजेच संसदेत चर्चा होणार आहे. मतदान होणार असून त्यानंतर इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर राहणार की पायउतार होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

इम्रान खान यांचे तिसरे लग्नही तुटणार..? -पंतप्रधान पदाबरोबर आता इम्रान खान यांचे तिसरे लग्नही तुटण्याच्या मार्गावर आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यातील मतभेद खूपच वाढले आहेत. बुशरा बीबी या इस्लामाबाद सोडून लाहोरला गेल्या आहेत. मैत्रिण सानिया शाहसोबत त्या राहत आहेत. तर दुसरीकडे बुशरा बीबी यांनी घर सोडताच इम्रान खान यांनी घरातील सर्व कर्मचारी बदलले आहेत. इम्रान खान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ, 2015 मध्ये रेहाना खान यांच्याशी विवाह केला होता. रेहान खानसोबत लग्नानंतर काही महिन्यातच इम्रान खान यांनी घटस्फोट घेतला होता.

हेही वाचा -IMRAN KHAN ON INDIA : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले भारताचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details