वेलिंग्टन - बालहट्टासमोर कोणाचेही काही चालत नाही. लहान मुलांच्या हट्टापुढे प्रत्येक जण गुडघे टेकतोच. लहान मुलांची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करतोच. एका देशाच्या पंतप्रधानही यातून सुटलेल्या नाहीत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांचेही आपली मुलगी नीवच्या हट्टापुढे काही चालले नाही. कोरोना विषयावरून देशाला फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जेसिंडा देशाला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांची मुलगी नीवने त्यांना आवाज दिला आणि झोपण्यासाठी येण्यास सांगितले. अखेर तिच्या हट्टापुढे जेसिंडा यांना फेसबूक लाईव्ह बंद करावे लागले. कणखर, कनवाळू, निश्चयी, धीरोदात्त, संयमी, प्रामाणिक अशी ओळख मिळवलेल्या जेसिंडा आर्डन पुन्हा एकदा आपल्या मातृत्व प्रेमामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा हा फेसबूक लाईव्हाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
रविवारी-सोमवारी रात्री 8-9 नोव्हेंबर 2021 च्या रात्री जेसिंडा फेसबूकच्या माध्यमातून आपल्या घरातूनच देशातील जनतेला संबोधित करत होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीवर त्या बोलत होत्या. कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने सरकारला मदत करावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी अचानक त्यांची मुलगी झोपेतून उठली आणि त्यांना हाक मारत होती. यावेळी जेसिंडा यांनी गोंधळून न जाता, तीला प्रेमाने आपल्या आजीसोबत झोपण्यास सांगितले. यानंतर मुलग फेसबूक लाईव्हमध्ये व्यत्यय आणल्याने त्यांनी जनतेची माफी मागितली.
यावेळी त्या जनेतला म्हणाल्या, की सध्या माझ्या मुलीजवळ माझी आई म्हणजेच तीची आजी आहे. तीच तीला सांभाळते. नाहीतर आतापर्यंत घरात वादळ उठलं असतं. तसेच फेसबूक लाईव्ह करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का, माझ्या मुलीप्रमाणे तुमचेही मुले रात्री झोपेतून उठतात का, असा प्रश्न जेसिंडा यांनी जनतेला केला.