महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नेपाळच्या पंतप्रधानांचे भवितव्य बुधवारी ठरणार; सत्ताधारी पक्षाची बैठक पुन्हा लांबणीवर - पुष्प कमल दहल प्रचंड न्यूज

नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

K.P.Sharma Oli
नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली

By

Published : Jul 6, 2020, 1:32 PM IST

काठमांडू- नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थायी समितीच्या बैठकीत पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या भवितव्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. ही बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज होणारी बैठक आता बुधवारी होणार आहे. पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार सुर्या थापा यांनी याबाबत माहिती दिली आहे. बैठक पुढे ढकलण्याचे कारण जाहीर करण्यात आले नाही.

नेपाळ कम्युनिस्ट पार्टीची बैठक शनिवारी होणार होती. पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना परिस्थितीवर विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी सोमवारपर्यंत पुढे ढकलली होती. पार्टीच्या स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या 45 इतकी आहे. स्थायी समिती पार्टीतील सर्वात महत्वाची समिती आहे.

रविवारी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी नेपाळच्या आर्मीचे प्रमुख पुर्ण चंद्रा थापा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे नेते माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी ओलींना भारताबाबत केलेल्या वक्तव्याबाबत फटकारत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ओली यांचे भारतविरोधी वक्तव्य हे राजकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे प्रचंड यांनी म्हटले होते.ओली आणि प्रचंड यांची स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी भेट होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details