नवी दिल्ली- कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारताने नेपाळला 23 टन अत्यावश्यक गोळ्या औषधांची मदत केली आहे. केलेल्या या मदतीमुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
CORONA : 23 टन अत्यावश्यक औषधांच्या मदतीनंतर नेपाळने मानले मोदींचे आभार - nepal corona help india
नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांकडे भारतीय दुतावासने ही मदत सुपूर्त केली. के. पी. शर्मा ओली ट्विटरवरून भारताच्या या मदतीचे आभार मानले आहेत.

नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांकडे भारतीय दुतावासने ही मदत सुपूर्त केली. के. पी. शर्मा ओली ट्विटरवरून भारताच्या या मदतीचे आभार मानले आहेत. भारताने अनेक मित्र देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी गोळ्या औषधे आणि वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे.
ब्राझील, कुवैत, अफगाणिस्तान, मालदिव, अमेरिका या देशांना भारताने मदत केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरे, हालड्रोक्लोरोक्वीन गोळ्या, पॅरासिटिमॉल यांची मदत भारताने मित्र देशांना केली आहे. कोरोना संकट काळात भारत मित्र देशांना शक्य तेवढी मतद करत राहील, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.