काठमांडू -नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना लोकप्रतिनिधी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यात अपयश मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पद गमाविले आहे. सीपएन प्रणित ((माओसिस्ट सेंटर)) पुष्पकम दहार प्राचंद यांनी पाठिंबा काढल्याने ओली सरकार हे अल्पमतात आले होते.
बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपदी विद्यादेवी भंडारी यांच्या आदेशाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान ओली यांना खालच्या सभागृहात केवळ ९३ मते मिळाली आहेत. ओली यांना २७५ सदस्यांच्या सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी १३६ मते मिळविणे अपेक्षित होते. नेपाळच्या घटनेप्रमाणे ओली यांनी बहुमत गमाविल्यामुळे त्यांचे पंतप्रधान पद संपुष्टात आले आहे.
हेही वाचा-सू मोटो सुनावणीत तांत्रिक अडचणी; सर्वोच्च न्यायालय १३ मे रोजी घेणार सुनावणी