अर्घाखांची -नेपाळमध्ये बसला झालेल्या अपघातात तब्बल १६ जण ठार झाले. अर्घाखांची जिल्ह्यात बस रस्त्यावरून घसरून ४०० मीटर खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली.
नेपाळमध्ये बस दरीत कोसळली, १६ प्रवासी ठार - नेपाळमध्ये बसला अपघात
नेपाळमध्ये बसला झालेल्या अपघातात तब्बल १६ जण ठार झाले. अर्घाखांची जिल्ह्यात बस रस्त्यावरून घसरून ४०० मीटर खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला.
नेपाळमध्ये बसला अपघात
या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अधिक तपास सुरू आहे.