नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी कर्तारपूर कॉरिडॉर पूर्ण केल्यामुळे मोदींचे कौतूक केले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. कर्तारपूर कॉरीडॉर पूर्ण करण्यामध्ये इम्रान खान यांनी म्हत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर मी मोदींचाही आभारी आहे. जरी आमच्या दरम्यान राजकीय मतभेद असले, तरी मी मोदींना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईलने येथून मिठी मारतो, असे सिद्धू म्हणाले आहेत.