महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नरेंद्र मोदी यांचा भूटान दौरा : रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये नागरिकांसोबत साधला संवाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी news

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय भूटान दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी भूटानच्या रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये नागरिकांसोबत संवाद साधला आहे.

नरेंद्र मोदी यांचा भूटान दौरा

By

Published : Aug 18, 2019, 11:21 AM IST

थिम्पू -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दोन दिवसीय भूटान दौऱ्यावर आहेत. रविवारी या दौऱ्यादरम्यान त्यांनी भूटानच्या रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये नागरिकांसोबत साधला संवाद आहे.

मोदी यांचे भाषणातील प्रमुख मुद्दे

  • भूटानचे तरुण शास्त्रज्ञ जर स्वतःचे छोटेसे उपग्रह बनवण्यासाठी आणि प्रक्षेपीत करण्यासाठी भारतात येणार असतील, तर ही फार आनंदाची बाब आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच, तुमच्या येथे अनेक शास्त्रज्ञ, अभियंता आणि नवीन शोधक होतील.
  • भूटानला खऱ्या अर्थाने एकता आणि करुणेची भावना समजली आहे. माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगेत उभे राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर उमटेलेल भाव हे सर्व दाखवून देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूटान दौर्‍यावर दाखल झाले आहेत. शनिवारी भूटानची राजधानी थिंपूमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचा हा दुसरा भूटान दौरा आहे पण दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासूनची ही पहिलीच भूटान भेट आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते भूटानच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details