क्वालालांपूर -मलेशियाचे माजी पंतप्रधान मोहम्मद महातीर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे, असे ते म्हणाले. फ्रान्सने भूतकाळात अनेक हत्याकांड केले आहेत. त्यात मुस्लिमांचाही समावेश होता. त्यामुळे आता फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार मुस्लिमांना असल्याचे ते म्हणाले. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केल्यानंतर मुस्लिम देशांतून फ्रान्सवर टीका करण्यात येत आहे.
महातीर मोहम्मद यांनी ट्विटरवर ही माहिती पोस्ट केली आहे. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅकरॉन यांच्यावर कडाडून टीका केली. लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे. मात्र, मुस्लिमांनी अद्याप सूडाच्या भावनेतून कोणतेही कृत्य केले नाही. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्यास फ्रान्सने त्यांच्या जनतेला शिकवावे, असे महातीर म्हणाले.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅकरॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. मुस्लिम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे मारले.
आज चाकू हल्ल्याची घटना