१७ डिसेंबरला, पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय विशेष न्यायालयाच्या खंडपीठाने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये पाकिस्तानात घटना रद्द करून घटनाबाह्य आणिबाणी लागू करण्याच्या उच्च देशद्रोहाबद्दल न्यायालयाने मुशर्रफ यांना दोषी ठरवले आहे.
दोन दिवसांनी प्रसिद्ध केलेल्या तपशीलवार निकालपत्रात, पाकिस्तानी लष्करावरही न्यायाधिशांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती सेठ यांनी आपल्या निकालात लिहिले आहे की, गणवेशातील एकाच माणसाकडून असे कृत्य व्हावे, हे अविश्वसनीय आणि कल्पनाही न करता येण्याजोगे आहे. तत्कालीन कमांडर समिती, सर्व गणवेशातील कार्यरत अधिकाऱ्यांशिवाय प्रत्येक वेळेला त्यांना संरक्षण देत होते, तेही तितकेच आरोपी व्यक्तीच्या कृत्यात बरोबरीने आणि संपूर्णपणे गुंतले होते.
मुशर्रफ, जे २०१६ पासून हद्दपार आहेत, नजीकच्या काळात फाशीला सामोर जाण्याची शक्यता नाहीच. तरीही, हा निकाल पाकिस्तानातील मुलकी-लष्करी संबंधांवर दूरगामी परिणाम करणारा असू शकतो. मी असू शकतो हा शब्द वापरला आहे कारण पाकिस्तान याकडे राजकीय परिप्रेक्ष्यावरील लष्करी वर्चस्वातून मुक्त होण्याची संधी म्हणून पाहते का, यावर ते अवलंबून आहे.
विशेष न्यायालयाने मार्ग दाखवला आहे. पूर्वी, पाकिस्तानी न्यायालयांवर लष्कराने नेहमीच देशाचा ताबा घेतल्याच्या कृत्यांना गरजेची संकल्पना असा हवाला देत संमती असल्याचा आरोप केला जात होता. ही संकल्पना असे सांगते की, लोकांच्या भल्यासाठी एखादे घटनाबाह्य प्राधिकरण सरकारचा ताबा घेऊ शकते. १९७७ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांची सत्ता उलथून पाडण्याच्या जनरल झिया उल हक यांच्या लष्करी बंडाला पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने समर्थनीय ठरवले होते. मुशर्रफ यांच्या पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधातील अशाच बंडासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने असाच निकाल दिला होता.
न्यायपालिका आता स्वतःचा अधिकार ठामपणे बजावत आहे. गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना दिलेली तीन वर्षांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने रोखून धरली. हे दोन्ही निकाल एकत्रितपणे पाहिले असता, दोन निकालांनी पाकिस्तान लष्कराला ते कायद्याच्या वर नाही, असा स्पष्ट संकेत दिला आहे.