महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कोरोना'चा कहर: 'चीनमधील हुबेई प्रांतातून भारतीयांना बाहेर काढण्यास सुरुवात' - चीन कोरोना व्हायरस

'कोरोना व्हायरसचा चीनमध्ये फैलाव झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारतीय परराष्ट्र विभागाने काम सुरू केले आहे', असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले.

RAVISH KUMAR
रविश कुमार

By

Published : Jan 28, 2020, 8:35 PM IST

नवी दिल्ली - चीनमधील हुबेही प्रांतामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयही अडकले आहेत. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हुबेई प्रांतीतील वुहान येथून भारतीयांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

'कोरोना व्हायरसचा चीनमध्ये फैलाव झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्यासाठी भारतीय परराष्ट्र विभागाने काम सुरू केले आहे', असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले.

चीनमधील भारतीय दुतावास नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करत आहे, आम्ही चीन सरकारच्याही संपर्कात आहोत. या सबंधीच्या घडामोडींची माहिती देत राहू, असे कुमार यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणिबाणीची घोषणा केली आहे. हुबेई प्रांतातील लोखो नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाण्यास सरकारने नागरिकांवर बंधने घातली आहेत.

न्युमोनिया सदृश्य कोरोना व्हायरसच्या संसर्गाने चीनमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांचा आकडा चार हजारांच्यावर गेला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून हुबेई प्रांताचा बाकी प्रदेशाशी संपर्क तोडण्यात आला आहे. शाळा, बाजार, सार्वजनिक कार्यक्रमे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच विमान, रेल्वे आणि बससेवा बंद ठेण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून चीनने जवळपास एक डझनहून अधिक शहरांमधील वाहतूक बंद केली आहे. तसेच नागरिकांनाही देशाबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जवळपास ६० दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर यामुळे परिणाम झाला आहे. तर, चीनमधील नववर्षासाठीच्या सुट्ट्यांचा कालावधी वाढवून, शाळा-विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या विषाणूला लढा देण्यासाठी चीनने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याचे काम चीनमध्ये सुरू आहे. तसेच, नवीन असलेल्या या आजारावर लस शोधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

कोरोना विषाणमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. आधीच एखादा आजार असणाऱ्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details