सेऊल -उत्तर कोरियात सत्ताधारी पक्षाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सत्ताधारी 'कामगार पक्षा'च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य लष्करी संचलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किम जोंग उन यांनी नवीन आण्विक शस्त्रांचे अनावरण केले व जगासमोर आपले शक्तीप्रदर्शन केले.
पोंगयांगयेथे किम संग क्वेअर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे लष्करी संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उत्तर कोरियातील राष्ट्रीय माध्यमांनी याचे थेट प्रक्षेपण केले. केसाँग प्रांतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान बेघर झालेल्या नागरिकांना सत्ताधारी पक्षाच्यावतीने नवीन घरांचा ताबा दिला गेला. या नागरिकांनी सत्ताधारी पक्ष आणि किम जोंग उन यांची स्तुती करत त्यांना 'काळजी घेणारे वडिल' असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.