महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट; 19 ठार - झेजियांग मधील घटना

पूर्व चीन मधील झेंजियांग प्रांतात नैसर्गिक वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरचा शनिवारी स्फोट झाला.या घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

rescue operation after tanker blast
गॅस टँकर स्फोटानंतरचे मदत कार्य

By

Published : Jun 14, 2020, 2:15 PM IST

बीजिंग- शनिवारी पूर्व चीनमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा स्फोट झाला. ही घटना वेनलिंग या शहरात घडली. या घटनेतील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

टँकरच्या स्फोटाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळपासच्या इमारतींना याचा फटका बसला आहे. या परिसरातील वाहने जळाली आहेत. या घटनेत जखमी झालेल्या 132 लोकांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

चीनमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट; 19 ठार

टँकरमधून द्रव स्वरूपातील वायूची वाहतूक करण्यात येत होती. शेनयांग-हाईकोउ एक्सप्रेसवेवर शनिवारी 4 वाजून 45 मिनिटांनी टँकरमधील वायूचा स्फोट झाला. हा भाग दक्षिण शांघाई मधील या झेजियांग प्रांतात येतो.

हायवेवर असणाऱ्या वर्कशॉप जवळच ही घटना घडल्यामुळे टँकरचा स्फोट झाल्यानंतर वर्कशॉप मध्येही स्फोट झाला झाला. या घटनेनंतर स्थानिक अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू करून घटनास्थळावरून नागरिकांना बाहेर काढले, त्यापैकी जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details