महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

क्योटो अॅनिमेशन स्टुडिओला भीषण आग; मृतांचा आकडा २३ वर... - Animation Studio

'क्योटो अॅनिमेशन' या अॅनिमेशन स्टुडिओला लागलेल्या आगीत २३ लोक दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे, तसेच ३० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत.

क्योटो अॅनिमेशन

By

Published : Jul 18, 2019, 2:52 PM IST

Updated : Jul 18, 2019, 3:23 PM IST

जपान - क्योटो येथील, 'क्योटो अॅनिमेशन' या स्टुडिओला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ लोक दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच ३० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध अद्यापही सुरुच आहे.

क्योटो अॅनिमेशन

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास, क्योटो येथील अॅनिमेशन स्टुडिओच्या तीन मजली इमारतीला आग लागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ पसरवून ही आग लावली होती. ज्यामध्ये ती व्यक्तीही जखमी झाली. त्या व्यक्तीची ओळख जाहीर केली नसली तरी, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी पाठवले आहे.

Last Updated : Jul 18, 2019, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details