प्योंग्यांग : दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग यांच्या सहकाऱ्याने उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. किम जोंग हे गेल्या काही दिवसांपासून कोमामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
किम जोंग उन हे गेल्या अनेक दिवसांपासून मीडियासमोर आले नाहीत. तसेच, त्यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी आपले काही अधिकार आपल्या लहान बहिणीला दिले होते.
यापूर्वीही किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा परसण्यात आल्या होत्या. मात्र, सुंचॉन प्रांतामधील एका खत निर्मिती कारखान्याच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावल्यानंतर या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला होता.
किम डे जुंग यांच्या माजी सहकाऱ्याच्या वक्तव्यामुळे मात्र पुन्हा किम जोंग यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. किम जोंग यांना काही झाल्यास, त्यांच्या जागी त्यांची ३२ वर्षांची बहीण उत्तर कोरियाची हुकूमशाह बनू शकते.
हेही वाचा :COVID-19 : रशियामधील आणखी एका लसीची मानवी चाचणी यशस्वी