महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डॅनियल पर्ल यांची हत्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित - daniel pearls murder international terrorism connection

दि वॉल स्ट्रीट जर्नलच्या दक्षिण आशिया ब्युरोचे प्रमुख पर्ल यांचे जानेवारी 2002 मध्ये कराची येथे अपहरण करण्यात आले होते. येथे ते धार्मिक कट्टरतावादावर संशोधन करत होते. या अपहरणाच्या नंतर एका महिन्याने त्यांचा शिरच्छेद केल्याचा ग्राफिक व्हिडिओ अमेरिकन वाणिज्य दूतावासाला पाठविला गेला. या प्रकरणी प्रमुख आरोपी ओमर शेख याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र, ती शिक्षा सात वर्षांच्या कैदेवर आणली.

डॅनियल पर्ल हत्या प्रकरण
डॅनियल पर्ल हत्या प्रकरण

By

Published : Dec 6, 2020, 5:16 PM IST

इस्लामाबाद - सिंध उच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ वकिलाने (एसएचसी) पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 2002 मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित घटनांचा एक भाग होती.

एका अहवालात डॉन न्यूजने म्हटले आहे की, बुधवारी वकील फारूक एच. नेक यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही टिप्पणी केली. सिंध सरकार, पर्लचे पालक आणि प्रमुख आरोपी ओमर शेख यांनी दाखल केलेल्या अपीलांवर या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 38 वर्षांच्या पत्रकाराच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी 2 एप्रिलला सिंध उच्च न्यायालयाने शेख याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात शेख याने अपील केले होते. ही शिक्षा न्यायालयाने सात वर्षांच्या कैदेवर आणली आहे. शेख हा युकेमध्ये जन्म झालेला पाकिस्तानी नागरिक आहे. त्याच्याव्यतिरिक्त या प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या अन्य तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, आपला दावा सिद्ध करण्यासाठी, नेक यांनी ट्रायल न्यायालयासमोर शेखने दिलेल्या साक्षीचाही मुद्दा उपस्थित केला. यात त्याने कदाचित आपणाला अमेरिकेकडे सुपूर्द केले जाण्याची भीती त्याने व्यक्त केली होती.

हेही वाचा -पाकिस्तान : पंजाब प्रांतात 52 टक्के सक्तीची धर्मांतरे

वकिलांनी असा युक्तिवाद केला की, या अपीलांचे भवितव्य ठरवण्यासाठी काही प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. हे प्रश्न आहेत - शेखने पर्लचे अपहरण करण्याचा कट रचला होता आणि अपहरणानंतर खंडणीची मागणी केली होती का? खंडणी मागण्यासाठी पर्लचे अपहरण केले गेले होते का? आणि 27 जानेवारी 2002 रोजी त्याच्या पत्नीला खंडणीसाठी एक ईमेल पाठवला गेला होता का? पत्रकाराला ठार मारण्याची धमकी देऊन 30 जानेवारी 2002 रोजी पाठवलेल्या दुसर्‍या ईमेलला तिने प्रतिसाद दिला नाही. यामध्ये पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

दि वॉल स्ट्रीट जर्नलच्या दक्षिण आशिया ब्युरोचे प्रमुख पर्ल यांचे जानेवारी 2002 मध्ये कराची येथे अपहरण करण्यात आले होते. येथे ते धार्मिक कट्टरतावादावर संशोधन करत होते. या अपहरणाच्या नंतर एका महिन्याने त्यांचा शिरच्छेद केल्याचा ग्राफिक व्हिडिओ अमेरिकन वाणिज्य दूतावासाला पाठविला गेला.

यानंतर शेख याला या प्रकरणात अटक करण्यात आली. ट्रायल न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा -काबुलमध्ये अफगाण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details