टोकियो - जपानच्या संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. किशिदा यांच्यावर कोरोना आणि इतर देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांना योग्यरित्या हाताळण्याचे आव्हान असणार आहे. माजी पंतप्रधान सुगा यांनी हाताळलेली कोरोनाची परिस्थिती, तसेच ऑलिम्पिक आयोजित करण्याचा केलेला आग्रह यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरातच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची जपानच्या नवीन पंतप्रधान म्हणून निवड - Japan's Parliament set to formally choose Kishida as Pm
माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. किशिदा यांच्यावर कोरोना आणि इतर देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांना योग्यरित्या हाताळण्याचे आव्हान असणार आहे.
किशिदा या जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक नवीन मंत्रिमंडळ तयार करण्याच्या तयारीत आहेत. जपानला उत्तर कोरियाकडून वाढत्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्राच्या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची देखील चाचणी केली आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत अपेक्षित सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी किशिदा या आवश्यक ती धोरणं जाहीर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये आरोग्य प्रणाली, लसीकरण मोहीम आदींचा समावेश असणार आहे.
हेही वाचा - पेंडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडूृलकर आणि शकीरासह जगभरातील नेते, अभिनेत्यांचा समावेश