टोकियो -आपल्या नाविन्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानने नुकतीच एका विशेष बुलेट ट्रेनची निर्मिती केली आहे. या ट्रेनचे नाव 'N700S सुप्रीम' असे आहे. या ट्रेनचे वैशिष्ट्य हा तिचा वेग नसून, भूकंपाच्या वेळी प्रवाशांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याची क्षमता आहे! होय, भूकंप सुरू असतानाही ही ट्रेन सुरक्षितपणे वाहतूक करू शकते.
N700S (एस याचा अर्थ सुप्रीम) ही जपानी शिंकन्सेन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांच्या N700 मालिकेतील सर्वात अलिकडची नवीन ट्रेन आहे. त्यांनी आतापर्यंत N700 आणि N700A मॉडेलची यशस्वीपणे निर्मिती केली आहे.
जपान हे आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध राष्ट्र असल्याने, निप्पॉनने (Nippon) नियोजित वेळेमध्येच N700S ट्रेनची निर्मिती केली. या ट्रेनचे उद्घाटन टोकियो ऑलिम्पिक २०२०च्या वेळी होणार होते, परंतु कोविड-१९ महामारीमुळे उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
'N700S सुप्रीम'ची वैशिष्ट्ये..
ही ट्रेन ताशी ३६० किलोमीटर वेगाने धावू शकते. तसेच याचा ऑपरेटिंग वेग तासाला २८५ किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवता येऊ शकतो. या ट्रेनची एकमेव द्वितीय वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षा प्रणाली. शिंकन्सेन नेटवर्कमध्ये भूकंपाच्या लहरी त्वरित ओळखण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. विशेष ब्रेकिंग सिस्टमसह सुसज्ज असणारी ही नवीन ट्रेन अगदी वेगात असताना देखील सुरक्षितपणे आणि सहजपणे थांबवली जाऊ शकते. शिवाय या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीसारखी सेल्फ-प्रोपल्शन यंत्रणा बसवली आहे. अशाप्रकारची यंत्रणा असलेली ही एकमेव ट्रेन आहे. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीजेचा पुरवठा खंडित झाल्यास सेल्फ-प्रोपल्शन सिस्टमद्वारे ही ट्रेन काही अंतर वीजेशिवाय चालवली जावू शकते. याव्यतिरिक्त, हे भूकंपादरम्यान उच्च जोखीमेच्या प्रदेशापासून बोगदा आणि उड्डाणपूलाच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढण्यासाठी ह्या ट्रेनची मदत घेतली जाऊ शकते.