महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जपानमध्ये अनिवासी परदेशी नागरिकांना बंदी, कोरोनाच्या 'युके स्ट्रेन'चे बाधित रुग्ण सापडल्यानंतर निर्णय - new COVID-19 strain

गेल्या आठवड्यात जपानने ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करणाऱ्या परदेशी लोकांना बंदी घातली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत सात रुग्णांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळल्यावर सर्वच अनिवासी परदेशी प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जपानमध्ये नवीन कोरोना विषाणूबाधितांपैकी पाच जण ब्रिटनमधून ाले होते. त्यांची विमानतळांवर केलेली कोरोना चाचणी सकारात्मक आली. तर, इतर दोघे टोकियोमध्ये सापडले.

जपान लेटेस्ट कोरोना न्यूज
जपान लेटेस्ट कोरोना न्यूज

By

Published : Dec 27, 2020, 7:09 PM IST

टोकियो - संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरलेल्या नवीन आणि अधिक संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या प्रकाराविरुद्ध सावधगिरी म्हणून जपान सर्व परदेशी नागरिकांच्या प्रवेशास देशात प्रतिबंध लागू केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही प्रवेशबंदी सोमवारपासून सुरू होईल आणि 31 जानेवारीपर्यंत असेल.

गेल्या आठवड्यात जपानने ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करणाऱ्या परदेशी लोकांना बंदी घातली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत सात रुग्णांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळल्यावर सर्वच अनिवासी परदेशी प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जपानमध्ये नवीन कोरोना विषाणूबाधितांपैकी पाच जण ब्रिटनमधून ाले होते. त्यांची विमानतळांवर केलेली कोरोना चाचणी सकारात्मक आली. तर, इतर दोघे टोकियोमध्ये सापडले.

हेही वाचा -फिलिपाइन्सने युकेच्या विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली

नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या शॉर्ट ट्रॅक कार्यक्रमांतर्गत जपानी नागरिक आणि रहिवासी परदेशी व्यक्तींना 14 दिवसांच्या विलगीकरणातून सूट देण्याच्या निर्णयालाही आता स्थगिती देण्यात आली आहे. देशात प्रवेश करणार्‍यांनी आता जपानला जाण्यापूर्वी 72 तास अगोदरचा कोरोना चाचणी नकारात्मक आल्याचा पुरावा घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच, आगमनानंतर दोन आठवडे स्वत: विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.

नोव्हेंबरपासून जपान मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या कोविड रुग्णांच्या समस्येशी झगडत आहे. मागील 24 तासांच्या कालावधीत जपानमध्ये 3 हजार 700 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या वाढून 2 लाख 17 हजार 312 वर पोहोचली आहे. या काळात 3 लाख 213 मृत्यूच्या घटनांची पुष्टी केली आहे. एकट्या टोकियोमध्ये 24 तासांत 949 नव्या रुग्णांची नोंद झाली असून तज्ज्ञांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना 'शांतपणे' सुट्टीचा काळ घालवण्यास सांगितले आहे.

हेही वाचा -हाँगकाँग : परदेशातून येणाऱ्यांसाठी कोविड-19 विलगीकरण कालावधी वाढला, 21 दिवस रहावे लागणार क्वारन्टाईन

ABOUT THE AUTHOR

...view details