ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये झालेल्या अकराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत, व्यापार आणि वित्तीय क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याशिवाय, दहशतवादविरोधी धोरणावर चर्चा केली गेली. समान संधीचे जग प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, ज्या नसल्याने प्रगतीच्या मार्गात अडथळे येत असल्याचे अचूक ओळखले होते, दहा वर्षांपूर्वी ब्रिक्स संघाचा उदय झाला. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच प्रमुख देशांची आद्याक्षरे जोडून 'ब्रिक्स' तयार झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने असा इशारा दिला आहे की, अमेरिका आणि चीन यांनी लादलेल्या करांच्या परिणामी व्यापार युद्धामुळे जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात ०.५ टक्के कपात होऊ शकते, जी दक्षिण आफ्रिकेच्या वार्षिक आर्थिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या परिणामांवर चर्चा केली. नरेंद्र मोदी यांच्याच शब्दात, जागतिक अर्थव्यवस्थेने दहशतवादात वाढ झाल्याने कोट्यवधी डॉलर आणि २.२५ लाख लोक जगभरात गमावले आहेत.
सात आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये भेटलेल्या ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांनी दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या धोरणांवर चर्चा केली. परिणामस्वरूप, रासायनिक अस्त्रांवर बंदीसह सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करण्यास समर्थनाचा पुनरूच्चार केला. दीड वर्षापूर्वी, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांनी हवालाविरोधी आणि दहशतवादाला निधीपुरवठा करण्याविरोधाचे पालन न केल्याबद्दल पाकिस्तानवर खटला चालवण्यास मान्यता दिली होती. फक्त पाकिस्तानच्या मदतीला धावून जात कार्यचालनविषयक अडचणी निर्माण करणाऱ्या चीनने सहकार्य केले नाही तर, दहशतवादविरोधी डावपेच यशस्वी होणार नाहीत.
ब्रिक्स देशांमधील गेल्या १० वर्षातील सहकार्य, समन्वय आणि सौहार्द्र संशयास्पद आहे. मोदी यांनी खुल्या सत्रातील आपल्या भाषणात ब्रिक्स देशांमधील आपसातील व्यापाराचे प्रमाण फक्त १५ टक्के आहे, असे उघड केले होते. जागतिक जीडीपीचा २३ टक्के आणि जागतिक लोकसंख्येच्या ४२ टक्के वाटा असलेल्या ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. पूर्वी, ब्रिक्स देश इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना आव्हान देऊन अमेरिका आणि जपान यांच्या बरोबरीने जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करतील, असे अनुमान होते.