इस्लामाबाद - सिंध प्रांताच्या पोलीस महासंचालकाचे अपहरण गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) आणि रेंजर्स या सुरक्षा दलाने केल्याचे पाकिस्ताने लष्कराने मान्य केले आहे. पाकिस्तानी मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे नेते मोहम्मद सफदर यांना मागील महिन्यात रात्री उशीरा खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. यावेळी एफआयआरवर सही करण्यासाठी पोलीस महासंचालकाचेच अपहरण करण्यात आले होते. मोहम्मद सफदर हे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचे जावई असून मरयम नवाज यांचे पती आहेत.
हेही वाचा -पाकव्याप्त गिलगिट बाल्टिस्तानचा दर्जा पाकिस्तानने बदलला, स्थानिकांचे आंदोलन
सफदर यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानात विरोधकांनी लष्कर आणि इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे लष्कराने या अटकेची चौकशी सुरू केली होती. त्यावर लष्कराच्या जनसंपर्क विभागाने आज अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून गुप्तचर यंत्रणा आणि रेंजर्स दोषी आढळल्याचे म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय चौकशीत घेण्यात आला आहे.