तैपई - अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही दिवसांपासून विविध आघाड्यांवर वाद सुरू आहे. त्यातील तैवान हा एक प्रमुख मुद्दा आहे. चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. मात्र, आता अमेरिकेने चीनला शह देत तैवानला मजबूत करण्याचा विडा उचलला आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्र विक्री केल्याने चीनचा चांगलाच पारा चढला आहे. त्यामुळे तैवानच्या आखातात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने आपल्या कारवाया वाढविल्या आहेत.
अमेरिकेकडून शस्त्र खरेदीनंतरही तैवानवर चिनी हल्ल्याचं सावट ? - तैवान चीन वाद
अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही दिवसांपासून विविध आघाड्यांवर वाद सुरू आहे. त्यातील तैवान हा एक प्रमुख मुद्दा आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्र विक्री केल्याने चीनचा चांगलाच पारा चढला आहे.
अमेरिकेने चिनी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशांत महासागर आणि तैवानच्या आखातात जहाजांचा ताफा तैनात केला आहे. तर चीनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मात्र, यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनने अमेरिकेला आपली लष्करी ताकद दाखविण्यासाठी तैवानच्या सागरी हद्दीतही अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र, अमेरिकेवर पहिल्यांदा हल्ला न करण्याचे आदेश चिनी लष्कराने आपल्या सैन्याला दिले आहेत. अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तैवानला नुकतेच भेट दिली आहे, त्यावरूनही चीन चवताळला आहे.
चीन अमेरिकेची विचारधारा बदलून कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा जगात लागू करू पाहत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून अमेरिकेला दुर सारण्याचा प्रयत्न चीकडून सुरू आहे. चिनी सरकारला अनुकूल स्थिती बनविण्यासाठी जगात त्यांच्याकडून आर्थिक घडी बदलण्यात येत आहे. संपूर्ण इंडो पॅसिफिक टाचेखाली आणण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याचे अमेरिकेच्या काँग्रेसने आपल्या अहवालात म्हटले आहे.