हल्माहेरा -इंडोनेशियातील हल्माहेरा या बेटाला शनिवारी ५.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. युनाटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सायंकाळी ४ वाजून २१ मिनिटांनी हा भूकंप झाला. याचे धक्के १० किलोमीटरच्या परिसरात जाणवले. सध्या तरी या भागात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
इंडोनेशियातील हल्माहेराला ५.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का - earthquake of 5.9 magnitude in indonesia
इंडोनेशिया हा देश पॉसिफिक महासागरातील भूकंपप्रवण क्षेत्रात वसला आहे. हा भाग जगातील 'रिंग ऑफ फायर'मध्ये येतो. येथे मोठ्या प्रमाणात भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात.
भूकंप
इंडोनेशिया हा देश पॉसिफिक महासागरातील भूकंपप्रवण क्षेत्रात वसला आहे. हा भाग जगातील 'रिंग ऑफ फायर'मध्ये येतो. येथे मोठ्या प्रमाणात भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात.
२ ऑगस्टला येथील बंटेन प्रांतात ६.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला होता. जावा बेटाजवळ झालेल्या या भूकंपात २०० घरांची पडझड झाली होती. तसेच, ४ लोकांना जीव गमवावा लागला होता.