काबूल -अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याने नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यातच काबूलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानतळावर जमलेल्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. जवळपास 150 भारतीय नागरिकांचे तालिबान्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.
तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे.
भारतीय नागरिकांचे अपहरण केले नाही. तर त्यांना सुरक्षित स्थळी नेले आहे, असे स्पष्टीकरण तालिबानकडून जारी करण्यात आले आहे. 150 भारतीयांना सुरक्षित विमानतळात नेले, असे तालिबानकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही सरकारी संस्थांनी याबाबत भाष्य केले नाही अथवा दुजोराही दिला नाही. काबूल विमानतळाच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू होता. त्याच वेळेस तालिबानींचा एक गट आला आणि त्या सर्वांना घेऊन गेल्याची माहिती आहे. यातून सुटलेल्या लोकांनी आपण अपहरणातून बचावल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न -