महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

भारतीय हवाई दलाने 'एलओसी'चे उल्लंघन केले - पाक लष्कराचा आरोप - इस्लामाबाद

भारतीय हवाई दलाने सीमेवर नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने ताबडतोब त्यावर कारवाई करत भारतीय विमानांना मागे धाडले, असे पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रवक्ते  मेजर जनरल आसिफ गफ्फूर यांनी मंगळवारी ट्विटद्वारे  म्हटले आहे.

इस्लामाबाद2

By

Published : Feb 26, 2019, 8:41 AM IST

इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने सीमेवर नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन झाल्यानंतर आम्ही तत्काळ कारवाई केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वातावरण कमालीचे तापले आहे. दररोज पाकिस्तानकडून कारवाई, हल्ल्यांविषयीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई दलावर आरोप केला आहे.

भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केले. पाकिस्तानी हवाई दलाने ताबडतोब त्यावर कारवाई करत भारतीय विमानांना मागे धाडले, असे पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफ्फूर यांनी मंगळवारी ट्विटद्वारे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी दलाचे प्रमुख (सीओएएस) जनरल क्वामार जावेद बाजवा यांनी शुक्रवारी सीमेवरील लष्करी तळांना भेट दिली होती. या भेटीत त्यांनी लष्कराला कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. बादवा यांनी सोमवारी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन सैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details