नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्येन झुआन फुक यांच्याशी व्हर्चुअली संवाद साधणार आहेत. दोन्ही नेते सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर ते प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2018 मध्ये व्हिएतनामचा दौरा केला होता. त्यानंतर व्हिएतनाम आणि भारतादरम्यानचे संबंध अधिक घट्ट झाले होते. यावेळी व्यापक रणनीतिक भागीदारीवर चर्चा झाली होती. अशी चर्चा आतापर्यंत व्हिएतनामने फक्त चीन आणि रशियासोबत केली आहे.