नवी दिल्ली - जपानमधील क्योटो शहरात आज (बुधवार) भारत आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये महत्त्वाच्या सामरिक मुद्द्यांवर चर्चा झाली. गरीब देशांशी भारत आणि जपानचे संबंध वाढविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. मुक्त व खुल्या इंडो पॅसिफिक महासागराची संकल्पना घेवून चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या चार देशांची काल क्योटो शहरात बैठक झाली. चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी चार देश एकत्र आले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जपानचे समकक्ष तोहिमित्सू मोटेगी यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक झाली. चीनचे अमेरिका आणि शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले असताना जागतिक स्तरावर क्वाड गट तयार होत आहे. यातील भारत एक महत्त्वाचा सदस्य आहे. तर जपानचाही चीनसोबत पूर्व समुद्रांतील बेटांवरून वाद सुरू आहे. त्यास भारत जपानच्या घनिष्ट संबंधांमुळे चीनचा जळफळाट सुरू आहे. क्योटो शहरात क्वाड देशांच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे चिनी सरकारच्या अधिकृत ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे.