नवी दिल्ली - जगभरात 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. प्रत्येक देशाची आरोग्य आणिबाणी हाताळताना दमछाक होत आहे. सुरक्षेची उपकरणे, वैद्यकीय उपकरणे गोळ्या औषधे यांचा तुटवडा भासत आहे. अशा कठीण परिस्थितीत भारताने शेजारील नेपाळ आणि मालदिव देशांना वैद्यकीय मदत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या लढ्यात भारताची नेपाळ, मालदीवला वैद्यकीय मदत
भारतीय वायू सेनेचे सी - 130 जे सुपर हर्क्युलीस मालवाहू विमानाने मालदिवला वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे. शेजारी देशांना कोरोनाचा सामना करताना मदतीचा हात म्हणून ही मदत करण्यात येत आहे.
भारतीय वायू सेनेचे सी - 130 जे सुपर हर्क्युलीस मालवाहू विमानाने मालदिवला वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे. शेजारी देशांना कोरोनाचा सामना करताना मदतीचा हात म्हणून ही मदत करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश सीमा भागातील गोरखपूर विमानतळावर वैदकीय मदतीचा साठा पोहचविण्यात आला आहे. तेथून नेपाळ प्रशासनाला हा साठा प्रशासन सुपूर्त करणार आहे. तसेच मालदिवकडेही वैदकीय मदत घेऊन वायू सेनेचे विमान लवकरच जाणार आहे.
कोरोनाच्या लढ्यातून सावरल्यानंतर चीन अनेक देशांना वैद्यकीय मदत करत आहे. त्यामुळे चीनचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतानेही अशा कठीण परिस्थितीत शेजारी मित्र देशांना वैद्यकीय मदत करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही 1 हजार 600 पेक्षा जास्त कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. येथील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करुन कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातही वैद्यकीय सुरक्षा उपकरणे आणि इतर संसाधनांना तुटवडा भासत आहे. अशा काळातही भारताने शेजारी देशांना वैद्यकीय मदत देऊ केली आहे.