महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

भारताने सियाचीन प्रदेश पर्यटकांसाठी खुला केल्याने पाकला झोंबल्या मिर्च्या - पाकिस्तानची भारतावर टीका

भारत सियाचीन हा प्रदेश पर्यटनासाठी खुला करु शकत नाही. कारण, भारताने या प्रदेशावर जबरदस्तीने ताबा मिळवला असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले आहे.

सियाचीन प्रदेश पर्यटकांसाठी खुला केल्याने पाकला मिर्च्या झोंबल्या

By

Published : Nov 22, 2019, 4:56 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये आपले नाक खुपसले आहे. भारत बर्फाळ प्रदेश सियाचीन हा पर्यटनासाठी खुला करु शकत नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे.


भारताकडून सद्भावनाची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही. भारत सियाचीन हा प्रदेश पर्यटनासाठी खुला करु शकत नाही. कारण, भारताने या प्रदेशावर जबरदस्तीने ताबा मिळावला असून सियाचीन हा वादग्रस्त प्रदेश आहे. आम्ही नेहमीच भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, असा फैसल यांनी म्हटले आहे.


जगातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा बर्फाळ प्रदेश सियाचीन हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. 21 ऑक्टोंबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही अधिकृत घोषणा केली होती.


सामान्यतः उणे 45 ते 60 अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत आव्हानात्मक स्थितीत भारतीय सैन्य तिथे तैनात असतात. समुद्रसपाटीपासून ११,००० हजार फुटांवर असलेल्या बर्फाळ प्रदेशामधील सियाचीन बेस कँम्पपर्यंत जाण्यासाठी भारताने सन २००७ पासून गिर्यारोहकांना परवानगी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details