नवी दिल्ली - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी म्हणजे आज सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा ( India and China holding the 15th round talk ) होत आहे. भारतीय हद्दीतील चुशुल मोल्डो मीटिंग पॉइंटमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 15 वी फेरी आहे. सकाळी 10 वाजता बैठक सुरू झाली. दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या पहिल्या 14 फेऱ्या झाल्या असून त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण, तोडगा अद्याप निघालेला नाही.
आत्तापर्यंतच्या चर्चेत दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सो लेक, गलवान व्हॅली आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सच्या उत्तर आणि दक्षिणी किनार्यावर सहमती दर्शवली आहे. उरलेल्या समस्या सोडवण्याबाबत आता दोन्ही बाजूने चर्चा होत आहे. यापूर्वी झालेली 14 व्या फेरीची चर्चा अनिर्णित राहिली हे विशेष.