मॉस्को : रशियाने चीनला पाठवण्यात येणाऱ्या एस-४०० मिसाईल्सची बॅच थांबवली आहे. तसेच, पुन्हा ही बॅच कधी पाठवण्यात येईल याबाबतही रशियाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
चीनच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तामधून ही माहिती समोर आली आहे. या वृत्तपत्राने मात्र रशियाचा हा निर्णय चीनच्या पथ्यावर पडणारा असल्याचे सांगितले आहे. या क्षेपणास्त्रांची डिलीव्हरी करण्याची प्रक्रिया किचकट आहे. चीनला यासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी ट्रेनिंगसाठी रशियाला पाठवावे लागणार आहेत. तसेच, रशियालाही या मिसाईलसोबत काही तंत्रज्ञ चीनला पाठवावे लागणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढे सगळे करणे शक्य नसल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.