महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान,' गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्सरचा वापर, पाहा VIDEO - पाक सरहद चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज

'पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केस, म्हशी, गाढव, कुत्रे आणि डुकरे विकण्याचा उपाय करून पाहिला आहे. आता ते बेली डान्स विकण्याच्या नव्या पातळीवर जाऊन पोहोचले आहेत,' असे एका ट्विटर यूजरने म्हटले आहे.

इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान,'

By

Published : Sep 9, 2019, 4:13 PM IST

Updated : Sep 9, 2019, 5:06 PM IST

इस्लामाबाद - पाक सरहद चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने नुकतेच एका 'इन्व्हेस्टमेंट समिट'चे आयोजन केले होते. यामध्ये गुंतवणूकदारांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या गुंतवणूकदारांच्या मनोरंजनासाठी चक्क बेली डान्सर्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी यांनी त्यांच्या ट्विटरवर या डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे. व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

हेही वाचा - काबूल हल्ल्यानंतर ट्रम्प यांची अमेरिका-तालिबान शांतता चर्चेतून माघार

गुंतवणूकदारांच्या समिटचे आयोजन 4 से 8 सप्टेंबरदरम्यान अझरबैजान येथील बाकू येथे करण्यात आले होते. या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती डान्सरचा फोटो घेताना दिसत आहे. व्हिडियोवर हे स्पष्ट होत आहे की, पाकिस्तानने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची लक्तरे झाली आहेत, हे तर जगजाहीर आहे. मात्र, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरण्याची वेळ पाकिस्तानच्या सरकारवर आली आहे, हे यातून समोर येत आहे. इम्रान खान विविध प्रसंगी आपले सरकार आल्यापासून पाकिस्तानमध्ये मोठा बदल झाल्याचा दावा करत असतात. मात्र, हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी पाकिस्तानचे हे पाऊल म्हणजे 'नया पाकिस्तान' असल्याचा टोला लगावला आहे.

हेही वाचा - लंडन : पाक समर्थकांचा भारतीय उच्चायुक्तालयासमोर हैदोस; अंडी, दगडफेक करत फोडल्या काचा

'पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केस, म्हशी, गाढव, कुत्रे आणि डुकरे विकण्याचा उपाय करून पाहिला आहे. आता ते बेली डान्स विकण्याच्या नव्या पातळीवर जाऊन पोहोचले आहेत,' असे एका ट्विटर यूजरने म्हटले आहे. 'गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानकडे बेली डान्सिंगशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही,' असेही आणखी एका ट्विटर युजरने लिहिले आहे.

सध्या पाकिस्तानचे आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यांना चीन, यूएई आणि सौदी अरबसारख्या देशांची मदत घ्यावी लागत आहे.

Last Updated : Sep 9, 2019, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details