लाहोर -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून पाकिस्तानमध्येही कोरोनाच फैलाव झाला आहे. कोरोना महामारीसंबधित देशातील नवीनतम घडामोडींवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली. कोरोना लढाईत म्हत्त्वाची भूमिका बजावणारे पोलिओ कर्मचारी आणि पायाभूत सुविधांवर त्यांनी चर्चा केली.
पाकिस्तानधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 हजार 348 वर पोहचला आहे. तर 335 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी बिल गेट्स यांच्याशी फोनवर चर्चा केली. पाकिस्तान कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची बिल गेट्स यांना सांगितले.