इस्लामाबाद -माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे नेते नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. मात्र, तुरुंगात असताना प्रकृती ढासळल्याने ते इंग्लंडला गेले होते. मात्र, अद्याप शरीफ पाकिस्तानात माघारी आले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान शरीफ यांना पाकिस्तानात माघारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरीफ यांच्या विरोधात पाकिस्तानातील अनेक न्यायालयात इतरही खटले सुरू आहेत.
नोव्हेंबर २०१९ ला नवाझ शरीफ पाकिस्तानात गेले आहेत. प्रकृती ढासळल्याने पुढील उपचारासाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांनी न्यायालयात परवानगी मागितली होती. इम्रान खान सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. मात्र, जर शरीफ यांना काही झाले तर त्यास पाकिस्तान सरकार जबाबदार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, उपचारास गेल्यानंतर त्यांनी माघारी येण्यास नकार दिला. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली.