महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

शीख भक्तांचे स्वागत करण्यासाठी कर्तारपूर सज्ज, इम्रान खान यांनी शेअर केली आकर्षक छायाचित्रे - पंतप्रधान इम्रान खान कर्तारपूर छायाचित्रे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी कर्तारपूर कॉरिडॉर आणि गुरुद्वाराची आकर्षक छायाचित्रे टि्वटवर शेअर केली आहे.

पंतप्रधान इम्रान खान

By

Published : Nov 3, 2019, 5:06 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी कर्तारपूर कॉरिडॉर आणि गुरुद्वाराची आकर्षक छायाचित्रे टि्वटवर शेअर केली आहे. गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त शीख भक्तांचे स्वागत करण्यासाठी कर्तारपूर सज्ज आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


लोकांच्या भावना लक्षात घेवून सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. इम्रान खान यांनी गुरुद्वारा आणि कर्तारपूर कॉरिडॉरचे बांधकाम वेळेवर पूर्ण केल्याबद्दल पाकिस्तानी सरकारचे अभिनंदन केले.

गुरुद्वाऱयांची आकर्षक छायाचित्रे
१२ नोव्हेंबरला शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५० वी जयंती आहे, त्याआधी कर्तारपूर कॉरिडॉर भाविकांसाठी सूरू करण्यात येणार आहे
इम्रान खान यांनी शेअर केली आकर्षक छायाचित्रे


शीख धर्मियांचे पवित्र स्थळ असलेले कर्तारपूर साहिब म्हणजेच गुरु नानक देव गुरुद्वारा भारतीयांसाठी खुला झाला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंती पूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये करार झाला आहे. या करारानुसार ५ हजार भारतीयांना दररोज विना व्हिजा कर्तापरपूर साहीब गुरुद्वारामध्ये माथा टेकवण्यासाठी जाता येणार आहे.

शीख भक्तांचे स्वागत करण्यासाठी कर्तारपूर सज्ज


शीखांचे पवित्र धर्मस्थळ गुरुद्वारा दरबार साहीब पाकिस्तानातील नुरवाला जिल्ह्यामध्ये असून, भारत पाकिस्तान सीमेपासून ४ कि.मी. पाकिस्तानच्या हद्दीत आहे. या ठिकाणी गुरुनानक यांनी १८ वर्षे वास्तव्य केले असून, त्यांनी अखेरचा श्वासही याच ठिकाणी घेतला. फाळणीनंतर हे पवित्र ठिकाण पाकिस्तानात गेल्याने भारतातील शीख धर्मीयांना या ठिकाणी जाण्यास अडचणी येत होत्या. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात येणार असून, नोव्हेंबरमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. मागील वर्षापासून भारत व पाकिस्तान या प्रकल्पावर चर्चा करत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details