इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. या कार्यक्रमापुर्वीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये इम्रान खान आमचा सिद्धू कुठाय असे विचारत आहेत.
कर्तारपूर कॉरिडॉरच्या समारंभस्थळी बसमधून जात असताना, आमचा सिद्धू आलाय का? तो कुठे आहे?, असे इम्रान खान यांनी विचारले आहे. इम्रान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.