नवी दिल्ली -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावरून राग व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे काश्मीरकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी टि्वटमध्ये केला आहे. तर काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षात आपल्या हक्कासाठी लढा देणारी १ लाख लोकं मारली गेली असल्याचा आरोप त्यांनी भारतावर केला आहे.
'काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांची डोळेझाक', इम्रान खान यांचा आरोप - इम्रान खान पुन्हा बरळले
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावरून राग व्यक्त केला आहे.
!['काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय माध्यमांची डोळेझाक', इम्रान खान यांचा आरोप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4717323-thumbnail-3x2-imran.jpg)
काश्मीर प्रकरणी आंतरराष्ट्रीय माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'ज्याप्रकारे हाँगकाँगमधील आंदोलनाला आंतरराष्ट्रीय माध्यमे महत्व देत आहेत आणि काश्मीरमधील मानवी हक्काच्या उल्लघंनाकडे दुर्लक्ष करत आहेत, हे पाहून मी चकीत झालो आहे', असे इम्रान खान यांनी पहिल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
'गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून संवाद पुर्णपणे बंद आहे. राजकीय नेत्यांसह हजारो लोकांना नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये लहाण मुलांचा देखील समावेश आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढा देताना गेल्या 30 वर्षांमध्ये आधिक १ लाख लोक मारले गेले आहेत', असे इम्रान खान यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.