महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून केरळ विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक

केरळ राज्यात एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी ऐकून दु: ख झाले.या घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेले. अल्लाह दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीत सामर्थ्य देईल, असे इम्रान खान यांनी शुक्रवारी ट्विट केले. आतापर्यंत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला.

Imran khan
इम्रान खान

By

Published : Aug 8, 2020, 1:33 PM IST

इस्लामाबाद (पाकिस्तान)-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेस दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. केरळ राज्यात एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी ऐकून दु:ख झाले. या घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेले. अल्लाह दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीत सामर्थ्य देईल, असे इम्रान खान यांनी शुक्रवारी ट्विट केले.

एअर इंडियाच्या बोईंग 737 या विमानाचा शुक्रवारी केरळमध्ये अपघात झाला. विमान दुबईहून करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते. विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाला. विमानात 191 प्रवासी होते. या अपघातात मुख्य पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 123 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण गंभीर जखमी आहे.

'वंदे भारत मिशन'अंतर्गत दुबईवरून भारतात आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या AXB-1344 विमानाचा कोझिकोडमध्ये अपघात झाला. पावसाळी वातावरणात विमान धावपट्टीवरून घसरले. विमान उतारावर ३५ फूट खाली गेले. यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले, असं ट्विट हरदीपसिंग पूरी यांनी केलं आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बचावकार्य पूर्ण झाल्याचे सांगितले.सर्व प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देखील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details