इस्लामाबाद - भारतीय आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. मात्र याच दिवसाबाबत पाकिस्तानचे नापाक मनसुबे समोर आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन 'काळा दिवस' म्हणून साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या टि्वटर खात्यावर प्रोफाईल फोटो ऐवजी काळा रंग भरला आहे.
पाकिस्तानमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातल्या सूचना पाकिस्तानतल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना देण्यात आल्या आहेत.
'ब्लॅक डे' साजरा करतायेत इम्रान खान, ट्विटर खातेही केले काळे
इम्रान खान यांनी गुरुवारी ट्वीट करुन काश्मीर मुद्यावर जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जर काश्मीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. जे काही घडत त्यावर जर मौन बाळगले तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी आंतरराष्ट्रीय संघाला दिला.
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच सैरभैर झाला आहे. 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत बोलताना त्यांनी भारतावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शेवटचे कार्ड खेळून धोरणात्मक चूक केल्याचे ते म्हणाले. मोदी आणि भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागणार असून त्यांनी काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण केले आहे, अशी टीका त्यांनी केली.