महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2021, 7:09 PM IST

ETV Bharat / international

बांगलादेशच्या हवाई दल प्रमुखांनी भारताला भेट दिलं 'व्हिंटेज विमान'

आरकेएस भदोरिया चार दिवसीय सदिच्छा भेटीवर बांगलादेशात आहेत. भारत आणि बांगलादेशच्या हवाई दलाच्या प्रमुखांनी एकमेकांना 'व्हिंटेज विमान' भेट म्हणून दिले आहेत. दोन शेजारी देशांमधील संबंधांचे स्मारक म्हणून विमान संग्रहालयात ठेवण्यात येईल.

बांगलादेशच्या हवाई दल प्रमुखांनी भारताला भेट दिलं 'व्हिंटेज विमान'
बांगलादेशच्या हवाई दल प्रमुखांनी भारताला भेट दिलं 'व्हिंटेज विमान'

ढाका (बांगलादेश) - भारत आणि बांगलादेशच्या हवाई दलाच्या प्रमुखांनी एकमेकांना 'व्हिंटेज विमान' भेट म्हणून दिले आहेत. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील सुवर्ण महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी त्यांनी एकमेंकाना विमान भेट दिलं. हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बांगलादेश हवाई दलाला अलूएट-3 हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले. तर बांगलादेश सरकारने भारताला त्यांचे एफ-86 साबर विमान भेट म्हणून दिले आहे. दोन शेजारी देशांमधील संबंधांचे स्मारक म्हणून विमान संग्रहालयात ठेवण्यात येईल.

भारत आणि बांगलादेशच्या हवाई दलाच्या प्रमुखांनी एकमेकांना 'व्हिंटेज विमान' भेट म्हणून दिले.

आरकेएस भदोरिया चार दिवसीय सदिच्छा भेटीवर बांगलादेशात आहेत. त्यांना बांगलादेश हवाई दल प्रमुखांनी आमंत्रित केले होते. भदोरिया 22 फेब्रुवारीला बांगलादेशला पोहोचले होते. या कालावधीत दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी अनेक द्विपक्षीय चर्चा झाली. 1971 च्या युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांनी आपल्या दौर्‍याची सुरूवात केली. भदौरिया यांनी बांगलादेश हवाई दलाच्या प्रमुख कार्यरत तळांनाही भेट दिली.

बांगलादेशची निर्मिती -

1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुसऱया युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरक्ष: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. या घटनेला 50 वर्ष यंदा पूर्ण झाले आहेत. या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details