महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांसह 16 जणांना अटक - हाँगकाँग

सरकारविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून हाँगकाँगच्या पोलिसांनी बुधवारी 16 जणांना अटक केली आहे. ज्यात दोन विरोधी पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे.

हाँगकाँग
हाँगकाँग

By

Published : Aug 26, 2020, 1:43 PM IST

हाँगकाँग - सरकारविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून हाँगकाँगच्या पोलिसांनी बुधवारी 16 जणांना अटक केली आहे. ज्यात दोन विरोधी पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. सरकारविरोधी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते टेड हुई आणि लैम चेउक-टिंग यांना अटक करण्यात आली आहे.

लैम चेउक-टिंग यांनी अटकेसंदर्भातली माहिती टि्वटरवर दिली. जुलै 2019 मधील आंदोलनादरम्यान मालमत्तेचे नुकसान आणि न्याय मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच 21 जुलै 2019 ला दंगा केल्याचा आरोपही आहे. तर टेड हुई यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांची स्पष्टपणे माहिती दिली नाही.

दोन वेगळवेगळ्या पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी पक्षाच्या दोन्ही सदस्यांना अटक केल्याच्या बातमीला डेमोक्रॅटिक पक्षाने दुजोरा दिला आहे. अटक केलेल्या 16 जणांमध्ये 26 ते 48 वर्षीय व्यक्ती आहेत. दरम्यान, जुन 2019 मध्ये अंदोलन सुरू झाल्यापासून हाँगकाँग पोलिसांनी तब्बल 9 हजार पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details