हाँगकाँग- सरकारने हाँगकाँगमध्ये 'अँटी मास्क' (चेहरा झाकून घेणे) कायदा लागू केल्यामुळे जनआंदोलन पेटले आहे. नव्या कायद्यानुसार नागरिकांना आंदोलनादरम्यान चेहरा झाकून घेता येणार नाही. त्यामुळे सरकार विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे स्थानकांचे नुकसान केल्यामुळे हाँगकाँगमधील रेल्वे सेवा पूर्णता बंद पडली आहे. तसेच शहरातील खासगी आणि सरकारी मालमत्तांचेही नुकसान करण्यात आले आहे.
हेही वाचा-फ्रान्सच्या पोलीस मुख्यालयात चाकू हल्ला, चार अधिकारी ठार
हाँगकाँगमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचे लोन पसरले आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करणेही शक्य होत नाही. आंदोलकांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे.