इस्लामाबाद -पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजय लालवाणी असे पत्रकाराचे नाव आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अजय लालवाणी हे स्थानिक टेलिव्हिजन चॅनल आणि उर्दू भाषेतील वृत्तपत्र 'डेली पुचानो' मधील पत्रकार होते.
लालवाणी हे सुकुर शहरातील एका दुकानात बसले होते. तेव्हा मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. लालवाणी यांचे कोणाशीही वैर नव्हते, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांनी दावा केला, की वैयक्तिगत वादातून हा हल्ला झाला. पोलिसांनी शुक्रवारी तिघांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.